नमस्कार मी मयुर पवार माध्यमिक शिक्षक असून या शिक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्ष पेक्षा अधिक काळ अध्यापन केल्यानंतर असे दिसून आले की ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असते पण शिक्षण घेत असताना सोयी सुविधा नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेत असताना अडचणी येत असतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक मदत देखील व्हावी तसेच त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ही परिक्षाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभागी व्हावे आणि अधिकाधिक बक्षीसे जिंकून आपले मनोबल दृढ करावे. ही परीक्षामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल.
दहावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचे देखील काम या माध्यमातून केले जाणार आहे.
जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक मदत करून त्यांचे मनोबल वाढवण्याचे आमचे हे ध्येय आहे.
© STSE. Developed by S J Infotech